मुंबई : पाकिस्तानचा सुप्रसिद्ध गायक अदनान सामी याला भारताचं नागरिकत्व मिळण्याची शक्यता आहे.
सुमारे पंधरा वर्षांपासून भारतात राहणारा अदनान सामी यानं आपल्याला भारताचं नागरिकत्व मिळावं, असा अर्ज केला होता. दरम्यान कलेच्या क्षेत्रातलं अदनान सामीचं योगदान पाहता, त्याला भारतीय नागरिकत्व देण्यासाठी भारताचे एटर्नी जनरल यांनी सकारात्मकता दर्शवली होती. तर केंद्रीय गृह मंत्रालय सुद्धा त्याबाबत अनुकूल विचार करत आहे.
दरम्यान, अदनान सामीची कायमस्वरुपी भारतीय नागरिकत्वाची मागणी पूर्ण झाल्यास, शिवसेना याबाबत काय भूमिका घेणार? हे पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.