सोशल मीडियावर पॉल वॉकरचं भूत 'वायरल'!

हॉलिवूड सिनेमा 'फास्ट अॅन्ड फ्युरिअस - ७' भारतात प्रदर्शित झालाय. याचसोबत, या सिनेमानं जगभरात अनेक रेकॉर्डस् कायम केलेत. आता याच सिनेमाचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल होतोय.

Updated: Apr 15, 2015, 04:25 PM IST


पॉल वॉकरचं 'भूत'

नवी दिल्ली : हॉलिवूड सिनेमा 'फास्ट अॅन्ड फ्युरिअस - ७' भारतात प्रदर्शित झालाय. याचसोबत, या सिनेमानं जगभरात अनेक रेकॉर्डस् कायम केलेत. आता याच सिनेमाचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल होतोय.

या फोटोत 'फास्ट अॅन्ड फ्युरिअस' सीरीजमध्ये डॉमनिक टॉरिटोची भूमिका निभावणाऱ्या अभिनेता विन डीजलसोबत दिवंगत अभिनेता पॉल वॉकर याचं 'भूत'ही दिसतंय. 

खरं म्हणजे हा फोटो आर्टिस्ट जेफरी रेमंड यांनी बनवलाय. या फोटोत अभिनेता विन डीजल एका कारला टेकून उभा आहे.... आणि त्याच्यासोबत दिवंगत अभिनेता पॉल वॉकरची सावलीही दिसतोय. 

डीजल आणि पॉल वॉकर खऱ्याखुऱ्या आयुष्यातही खूप चांगले मित्र होते. इतकंच नाही तर पॉलच्या आठवणींमुळेच डीजलनं आपल्या मुलीचं नाव 'पौलीन' असं ठेवलंय. 

एका कार अपघातानंतर २०१३ मध्ये पॉल वॉकरचा मृत्यू झाला होता. त्यावेळी, तो 'फास्ट अॅन्ड फ्युरिअस - ७'ची शूटींग करत होता. या सिनेमात त्याचं उरलेलं शूट बॉडी डबलचा वापर करून शूट करण्यात आला. 

'फास्ट अॅन्ड फ्युरिअस-७' ३ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. आत्तापर्यंत आलेल्या सीरिजमधला हा सर्वात हिट सिनेमा ठरलाय. या सिनेमानं भारतात हॉलीवूड सिनेमाचा पहिल्या दिवसाच्या कमाईचा सर्वोच्च रेकॉर्ड कायम केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.