'कुमकुम भाग्य': प्रज्ञावर बलात्कार

प्रसिद्ध हिंदी सीरियल 'कुमकुम भाग्य'मध्ये नुकतीच प्रज्ञाचा मेकओव्हर केला गेलाय. पण आता सीरियलमध्ये एक नवा ट्विस्ट येतोय. सीरियलच्या आगामी भागात प्रज्ञावर बलात्कार होणार आहे.

Updated: Sep 23, 2015, 10:34 PM IST
'कुमकुम भाग्य': प्रज्ञावर बलात्कार title=

मुंबई: प्रसिद्ध हिंदी सीरियल 'कुमकुम भाग्य'मध्ये नुकतीच प्रज्ञाचा मेकओव्हर केला गेलाय. पण आता सीरियलमध्ये एक नवा ट्विस्ट येतोय. सीरियलच्या आगामी भागात प्रज्ञावर बलात्कार होणार आहे.

सीरियलमध्ये प्रज्ञाची भूमिका साकारलीय अभिनेत्री श्रीति झा हिने... मिळालेल्या बातमीनुसार सीरियलमध्ये प्रज्ञाचं अपहरण होईल, मग तिचा नवरा अभी (शब्बीर आहलुवालिया) तिला शोधण्यासाठी निघेल. पण तो तिला शोधपर्यंत तिच्यावर गुंडांनी बलात्कार केलेला असेल.

एका इंटरटेनमेंट वेबसाइटनुसार सीरियलमधील प्रमुख असलेल्या प्रज्ञावर बलात्कार झाल्यानं संपूर्ण मेहरा कुटुंब धक्क्यात असेल. चर्चेनुसार प्रज्ञाचं अपहरण आणि बलात्कारचा पूर्ण कट अभीची बहिण आलिया (शिखा सिंह)नं रचलाय. यात तिला तनु आणि राजनं सहकार्य केलं. 

या तिघांनी प्रज्ञाच्या बहिणीला बुलबुलला सुद्धा धमकी दिली. जर तिनं पूरब म्हणजे अर्जित तनेजाला सोडलं नाही तर तिलाही गंभीर परिणाम भोगावे लागतील. प्रज्ञासोबत घडलेल्या या घटनेमुळं प्रज्ञा आणि अभी दोघंही शॉकमध्ये आहे. पुढील भागांमध्ये काय घडेल हे लवकरच कळेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.