मराठीला वेळ देण्यासाठी 'झलक दिखला जा'ला दगडूचा नकार!

'टाईमपास' फेम 'दगडू'नं 'झलक दिखला जा' या हिंदी कार्यक्रमात सहभाग घेण्यास नकार दिलाय. कारण, प्रथमेशला मराठी चित्रपटांत काम करायचंय. 

Updated: Jul 11, 2015, 03:52 PM IST
मराठीला वेळ देण्यासाठी 'झलक दिखला जा'ला दगडूचा नकार! title=

मुंबई : 'टाईमपास' फेम 'दगडू'नं 'झलक दिखला जा' या हिंदी कार्यक्रमात सहभाग घेण्यास नकार दिलाय. कारण, प्रथमेशला मराठी चित्रपटांत काम करायचंय. 

बालक-पालक आणि टाईमपास या चित्रपटांमुळे अल्पावधीतच प्रथमेशनं चांगलीच लोकप्रियता मिळवलीय. अर्थातच, यामुळे प्रथमेशकडे मराठी चित्रपटांच्या अनेक ऑफर्सही चालून आल्या... प्रथमेश सध्या तीन मराठी चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.

अशातच त्याला एका प्रसिद्ध हिंदी रिअॅलिटी कार्यक्रमाची ऑफरही चालून आली. 'कलर्स' वाहिनीकडून प्रथमेशला 'झलक दिखला जा' या डान्स रिअॅलिटी शोसाठी विचारणा करण्यात आली. पण, मराठी चित्रपटांत व्यस्त असल्याचं सांगत प्रथमेशनं या कार्यक्रमाला स्पष्ट शब्दांत नकार दिलाय. 

खरं तर रिअॅलिटी शोमध्ये आणि तेही हिंदीत झळकण्याची संधी सहसा कोणीच सोडत नाहीत. रिअॅलिटी शोमुळे अल्पावधीत लोकप्रियता मिळते. अनेक कलाकार तर यासाठी आपल्या चालू प्रोजेक्ट्सवर पाणी सोडतात. अशी खूप उदाहरणं आपल्याला आजुबाजुला आढळतील. पण, प्रथमेशनं मात्र आपल्या हातातील मराठी प्रोजेक्टसना जास्त महत्त्व दिलंय. 

मराठी चित्रपटांच शुटिंग सुरू असल्यामुळे नृत्यासाठी वेळ देणं कठिणच आहे.... तसंच हातात असलेली कामं पूर्ण करायला मी प्राधान्य देईन, असं प्रथमेशनं म्हटलंय.   

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.