मी सलमान खानसाठी काहीही करेल

सलमान खानवर अनेक फॅन्स जीव ओवाळून टाकतात. पण या ठिकाणी कोणत्या गोष्ट फॅनची नाही तर एका बॉलीवूडच्या अभिनेत्रीची आहे. 

Updated: Apr 17, 2015, 08:49 PM IST
मी सलमान खानसाठी काहीही करेल  title=

मुंबई : सलमान खानवर अनेक फॅन्स जीव ओवाळून टाकतात. पण या ठिकाणी कोणत्या गोष्ट फॅनची नाही तर एका बॉलीवूडच्या अभिनेत्रीची आहे. 

चित्रपटातून क्रिकेटच्या मैदानावर उडी घेणाऱ्या डिंपल गर्ल प्रिती झिंटाने म्हटले की, मी सलमानसाठी काही करण्यास तयार आहे. 

सध्या प्रिती आजकाल चर्चेत आहे. तिला बॉलीवूडमध्ये कमबॅक आणि आयटम नंबरबद्दल विचारले असता ती म्हणाली, मी एक अभिनेत्री आहे. कोणत्याही आयटम नंबरवर नाचण्याची माझी इच्छा नाही. विशेष म्हणजे २००९ मध्ये सलमान खानचा मी आणि मिसेज खन्नामध्ये आयटम नंबर केला होता. 

मी शेवट्या वेळी आयटम नंबर केला होता, ते केवळ सलमानमुळेच केला होता. मी सलमानवर प्रेम करते त्याच्यासाठी काहीही करू शकते. 

प्रितीवर सलमान मेहरबान.... दिला बॉडीगार्ड...
सलमान आणि प्रितीने एकत्र अनेक चित्रपटात काम केले आहे. यात हर दिल जो प्यार करेगा, चोरी चोरी चुपके चुपके आणि जानेमन यांचा समावेश आहे. ते आज पण चांगले मित्र आहेत. 

मी एक अभिनेत्री आहे, केवळ अभिनयावर लक्ष्य केंद्रीय करू इच्छिते. आयटम नंबर करू शकत नाही. मला डान्स आवडतो पण आयटम नंबर करू इच्छित नाही. 

विशेष म्हणजे प्रिती झिंटा यंदा डान्सचा रिअॅलिटी शो नट बलिये ७ ची जज आहे. तिच्यासोबत चेतन भगत आणि मास्टर मर्जी आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.