प्रेम इज बॅक; पाहा, 'प्रेम रतन धन पायो'चा ट्रेलर

सलमान खान आणि सोनम कपूर यांचा बहुचर्चित सिनेमा 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Oct 2, 2015, 10:55 AM IST
प्रेम इज बॅक; पाहा, 'प्रेम रतन धन पायो'चा ट्रेलर title=

मुंबई : सलमान खान आणि सोनम कपूर यांचा बहुचर्चित सिनेमा 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. 

'प्रेम'... हे नाव सलमाननं आजवर अनेक सिनेमांत धारण केलंय. याच नावानं तो या सिनेमातही दिसणार आहे. सूरज बडजात्या यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. 

एका कौटुंबिक सिनेमाच्या रुपात हा सिनेमा प्रदर्शित केला जातोय. बडजात्या हे आपल्या हम आपके है कौ, हम साथ-साथ है या सिनेमांसाठी ओळखले जातात. 

सलमानच्या या आगामी सिनेमातही कौटुंबिक समस्या, रोमान्स आणि अॅक्शनही पाहायला मिळणार आहे. सिनेमातील सीन्स भव्य-दिव्य करण्याचा प्रयत्न केल्याचं तुम्हाला या ट्रेलरमधून लगेचच लक्षात येईल... हा सिनेमा 12 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.