एकता कपूरच्या नव्या रिअॅलिटी शोमध्ये पाहा कोण असणार?

एकता कपूरचा 'नच बलिए' या  रिअॅलिटी शोचा सिजन-७ लवकरच सुरु होत आहे. 'नच बलिए'ची ओळख सेलिब्रिटींचा शो अशी आहे. त्यामुळे या नव्या भागात कोण सेलिब्रिटी असणार याची उत्सुकता आहे.चर्चा आहे ती प्रियंका चोप्राची!

Updated: Apr 3, 2015, 08:48 PM IST

मुंबई : एकता कपूरचा 'नच बलिए' या  रिअॅलिटी शोचा सिजन-७ लवकरच सुरु होत आहे. 'नच बलिए'ची ओळख सेलिब्रिटींचा शो अशी आहे. त्यामुळे या नव्या भागात कोण सेलिब्रिटी असणार याची उत्सुकता आहे.चर्चा आहे ती प्रियंका चोप्राची!

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोहेब अख्तर त्याची पत्नी रुबाब हिच्यासोबत या शोमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. शोहेबने गेल्याच वर्षी रुबाबसोबत निकाह केला होता.

बॉलिवूडची स्टार प्रियंका जजच्या भ़ूमिकेत असेल असे सांगण्यात येत आहे. सिजन - ७ मध्ये शिल्पा शेट्टीच्या जागी नवीन जज म्हणून सहभागी होण्याबाबत विद्या बालन, करीना कपूर आणि प्रियंका चोप्रा यांच्याशी चर्चा सुरु होती. मात्र आता प्रियंका या शोमध्ये सहभागी होणार हे निश्चित झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

याआधीच चेतन भगत याने  ट्वीट करुन तो या सिजनचा जज असणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे दुसरा जज कोण असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.