प्रियंका चोप्राचा रेड कार्पेटवर पुन्हा जलवा

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राचा रेड कार्पेटवरचा जलवा पुन्हा एकदा पहायला मिळाला.

Updated: May 2, 2017, 08:51 PM IST
प्रियंका चोप्राचा रेड कार्पेटवर पुन्हा जलवा  title=

न्यूयॉर्क : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राचा रेड कार्पेटवरचा जलवा पुन्हा एकदा पहायला मिळाला. प्रियंकाने क्रिम कलरच्या आकर्षक गाऊनमध्ये रेड कार्पेटवर एन्ट्री केली आणि अऩेकांचं लक्ष या फॅशन गर्लने आपल्याकडे वेधून घेतलं.

रेड कार्पेटवरचा हा जलवा भारतातला नव्हे तर न्यूयॉर्कमधला होता. मेट गाला 2017 मध्ये प्रियंकाचा हा लूक चांगलाच भाव खावून गेला. अमेरिकन टीव्ही सीरिज क्वांटिकोमध्ये सीआयए एजंटची भूमिका प्रियंका करतेय. याच लूकमध्ये प्रियंका बूट घालून या पार्टीत दाखल झाली.

एवढा मोठा लांबसडक गाऊन कॅरी करताना प्रियंकाला खास एका असिस्टंचीही मदत घ्यावी लागली. मात्र असं असलं तरी प्रियंकाने या गाऊनमध्ये स्वतःला आत्मविश्वासाने कॅरी केलं. प्रियंकाचा हॉलिवूडच्या कलाकारांसोबतचा या रेड कार्पेटवरचा वावर एकदम बिंधास्त होता.  

संपूर्ण पार्टीत प्रियंकाने आपलं लक्ष वेधून घेतलं होतं, जणू काही प्रियंकाने इथे आपल्या स्टाईल स्टेटमेन्टचीच छाप पाडली. आता अशीही चर्चा होऊ लागलीये की प्रियंकाचा हा ड्रेस वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद करू शकतो. सोशल मीडियावरही या तिच्या हटके ड्रेसबद्दल फॅन्सनी कमेंट्सचा वर्षाव केलाय.