शाहरुखचा रईस अडचणीत

शाहरुख खानचा रईस हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला रिलीज होणार आहे.

Updated: Jan 23, 2017, 08:57 PM IST
शाहरुखचा रईस अडचणीत title=

मुंबई : शाहरुख खानचा रईस हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. मात्र तत्पूर्वी शाहरुख खान अडचणीत येण्याची शक्यता आहे. रईस फिल्म ज्या गुजरातच्या माफिया डॉनवर आधारित आहे त्या अब्दूल लतीफवर आपण यापूर्वीच २०१४ मध्ये फिल्म रिलीज केल्याचा दावा रिनू केवल सेठ या निर्मात्यांनी केलाय.  

याबाबत त्यांनी मुंबईतील दिंडोशी सिव्हिल कोर्टात शाहरुख खानच्या रेड चिली कंपनीविरोधात दावा दाखल केलाय. या स्टोरीचे कॉपीराईट आपल्याकडे असल्याने रईसचं प्रदर्शन रोखावं अशी मागणी करण्यात आलीये.