'प्रोजेक्ट मराठवाडा' चित्रपटाचा ट्रेलर लॅांच

दुष्काळ, पाणीटंचाई यांसारख्या समस्यांवरील बातम्या आपण रोजच बघत, ऐकत असतो. मराठवाड्यातील दुष्काळाचे हेच भीषण स्वरुप 'प्रोजेक्ट मराठवाडा' या चित्रपटाच्या माध्यमातून समोर आणले जाणार आहे.

Updated: May 23, 2016, 04:47 PM IST
'प्रोजेक्ट मराठवाडा' चित्रपटाचा ट्रेलर लॅांच title=

मुंबई : दुष्काळ, पाणीटंचाई यांसारख्या समस्यांवरील बातम्या आपण रोजच बघत, ऐकत असतो. मराठवाड्यातील दुष्काळाचे हेच भीषण स्वरुप 'प्रोजेक्ट मराठवाडा' या चित्रपटाच्या माध्यमातून समोर आणले जाणार आहे.

प्रकाश पटेल, जिग्ना पटेल, जय पटेल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या ३ जूनला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी हे प्रमुख भूमिकेत दिसणार असून दिलीप ताहिल, गोविंद नामदेव, सीम्स बिसवास यांच्याही भूमिका आहेत.