बाहुबलीला रजनीकांतचा सलाम!

बाहुबली-2नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. भारतीय सिनेमाची सगळीच रेकॉर्ड बाहुबलीनं मोडली आहेत.

Updated: May 1, 2017, 05:54 PM IST
बाहुबलीला रजनीकांतचा सलाम! title=

चेन्नई : बाहुबली-2नं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. भारतीय सिनेमाची सगळीच रेकॉर्ड बाहुबलीनं मोडली आहेत. बाहुबलीवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच रजनीकांतनही बाहुबलीचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

बाहुबली चित्रपट हा भारतीय सिनेमाचा अभिमान आहे. राजमौली आणि बाहुबलीच्या टीमला माझा सलाम असं ट्विट रजनीकांतनं केलं आहे.

पहिल्या वीकेंडमध्ये या सिनेमाने जगभरात साधारण ५४० कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जातेय. या सिनेमाने पहिल्या वीकेंडमध्ये ४१५ कोटी कमावलेत. तर इतर देशांमध्ये १२५ कोटींची कमाई केलीये. त्यामुळे एकत्रितरित्या या सिनेमाने जगभरातून तब्बल ५४० कोटींचा गल्ला जमवलाय.

या सिनेमाने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा आकडा पार केला होता. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉलीवूडमधील खानांच्या वर्चस्वाला धक्का दिला. बॉलीवूडमध्ये बॉक्स ऑफिसवर नेहमीच खानांचे वर्चस्व राहिलेय. मात्र बाहुबली २ने या सर्वानांच जोरदार धक्का दिलाय.