...जेव्हा एकाच ठिकाणी आले रणबीर, कतरीना आणि सलमान!

रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांच्या नातेसंबंधांचं गुपित एव्हाना उघड झालंय... अर्थातच सल्लूलाही याची चांगलीच कल्पना आहे... पण, रणबीर, कतरीना आणि सलमान हे एका वेळी एकाच ठिकाणी आले तर... 

Updated: Aug 25, 2015, 12:21 PM IST
...जेव्हा एकाच ठिकाणी आले रणबीर, कतरीना आणि सलमान! title=

नवी दिल्ली : रणबीर कपूर आणि कतरीना कैफ यांच्या नातेसंबंधांचं गुपित एव्हाना उघड झालंय... अर्थातच सल्लूलाही याची चांगलीच कल्पना आहे... पण, रणबीर, कतरीना आणि सलमान हे एका वेळी एकाच ठिकाणी आले तर... 

होय, असं घडलं खरं... नुकतीच कतरीना फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवालाच्या बुक लॉन्चिंगसाठी मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दाखल झाली होती. इथंच कतरीनाचा सध्याचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरही आपल्या फुटबॉल टीमच्या जर्सी लॉन्चिंगसाठी आला होता. इतकंच नाही तर कतरीनाचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खानही याच हॉटेलमध्ये काही कामासाठी आला होता. 

उल्लेखनीय म्हणजे, हे तीघं एकाच छताखाली आले  तेव्हा लव्हबर्डस कतरीना आणि रणबीर एकमेकांना भेटले मात्र त्यांची सलमानशी भेट होऊ शकली नाही. कारण, सलमान हॉटेलच्या ज्या मजल्यावर थांबला होता त्या मजल्यावरच यायला कुणाला परवानगी दिली गेलेली नव्हती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.