हे आहे 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' बंद होण्यामागील खरे कारण

मुंबई : गेला महिनाभर कलर्स चॅनलवरील 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' हा शो बंद होणार अशा बातम्या येतायत.

Updated: Jan 25, 2016, 01:23 PM IST
हे आहे 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' बंद होण्यामागील खरे कारण title=

मुंबई : गेला महिनाभर कलर्स चॅनलवरील 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' हा शो बंद होणार अशा बातम्या येतायत.  आता अखेर हा शो बंद होतोय. १२ जानेवारीला या शोच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण झाले आणि हा शो बंद होणार असल्याची घोषणा झाली.

हा शेवटचा भाग चॅनल प्रसारित करणार नसल्याच्या बातम्या आल्या आणि मग सोशल मिडीयावर फॅन्सनी गोंधळ घातला. कपिलनेही चॅनलला हा भाग प्रसारित करण्याची विनंती केली आणि काल म्हणजेच रविवारी हा भाग प्रसारित झाला.

शोचा निर्माता असलेला कपिल आणि चॅनल यांच्यात वाद होते. नव्याने आलेल्या 'कॉमेडी नाईट्स बचाओ'ला चॅनल जास्त महत्त्व देत असल्याबाबत कपिलने नाराजीही व्यक्त केली होती. त्याचबरोबर कपिलचे फटकळपणे वागणे चॅनलला खटकत होते. 

पण, सूत्रांच्या मते हा शो बंद कऱण्यामागचे कारण वेगळेच आहे. आर्थिक कारणामुळे हा शो बंद होतोय असं सूत्रांच म्हणण आहे. कपिलने चॅनलकडे जास्त फायद्याची मागणी केली जी चॅनलला अमान्य होती. शेवटी हा वाद टोकाला गेला आणि हा शो बंद करण्याचा निर्णय झाला.

आता कॉमेडी नाईट्स विथ कृष्णा अभिषेक हा शो त्याची जागा घेईल ज्यात भारती सिंग आणि सुदेश लाहिरी हे सुद्धा असतील.