...तर हे नातं आहे प्रियंका चोप्रा आणि 'डीडीएलजे'चं!

अभिनेत्री प्रियंका चोप्रानं केलाय एक नवा खुलासा. शाहरुख आणि काजोलचा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा चित्रपट माझ्या खूप आवडीचा आणि जवळचा आहे, असं प्रियंकानं म्हटलं आहे. बॉलिवूडमध्ये रोमॅन्सला अजरामर ठेवणाऱ्या या जोडीनं या शुक्रवारी हजार आठवडे पूर्ण केले आहेत.

Updated: Dec 15, 2014, 10:49 AM IST
...तर हे नातं आहे प्रियंका चोप्रा आणि 'डीडीएलजे'चं! title=

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रानं केलाय एक नवा खुलासा. शाहरुख आणि काजोलचा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा चित्रपट माझ्या खूप आवडीचा आणि जवळचा आहे, असं प्रियंकानं म्हटलं आहे. बॉलिवूडमध्ये रोमॅन्सला अजरामर ठेवणाऱ्या या जोडीनं या शुक्रवारी हजार आठवडे पूर्ण केले आहेत.

'डीडीएलजे'च्या बाबतीत तिच्या आठवणी ताज्या करताना प्रियंका चोप्रा सांगते की, तिच्या लहानपणी लोक तिला म्हणायचे ती काजोल सारखी दिसते.

प्रियंकाची ही सगळ्यात आवडती फिल्म असल्यानं अशी कॉम्पलिमेंट तिला खूप आवडायची. कदाचित त्या लोकांच्या कॉम्पलिमेंटमुळंच मी आज इतकी पुढे येऊ शकले. लहापणीच्या आठवणी सांगताना प्रियंकानं 'डीडीएलजे'ला मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.