आरजीव्हीची 'सिंगल एक्स' कामुक आणि रोमांचक

रामगोपाल वर्माने म्हटलेय, आरजीव्ही टॉकीज रिलीज करत आहे सिंगल एक्स. या शॉर्ट फिल्मचा पहिला लूक रिलीज होण्याआधी पोस्टर ट्विटरवर जारी करण्यात आलेय.

Updated: Feb 9, 2016, 12:41 PM IST
आरजीव्हीची 'सिंगल एक्स' कामुक आणि रोमांचक  title=

मुंबई : रामगोपाल वर्माने म्हटलेय, आरजीव्ही टॉकीज रिलीज करत आहे सिंगल एक्स. या शॉर्ट फिल्मचा पहिला लूक रिलीज होण्याआधी पोस्टर ट्विटरवर जारी करण्यात आलेय.

रामगोपाल वर्माने ट्विटरवर एक "Single X" सिनेमाचा फोटो अपलोट केलाय. तो अत्यंत कामुक रोमांचक आहे. त्यामुळे या सिनेमात काय असेल याचा अंदाज येत आहे. दरम्यान, रामगोपालने दुसरा ट्विट करताना म्हटलेय, एक ऑनलाईन थिएटर ही शॉर्ट लॉन्च करणार आहे. या थिएटरचे नाव असेल आरजीव्ही. #RGVtalkies 

#RGVtalkies या थिएटरची ही पहिली शॉर्ट फिल्म रिलीज होत आहे. या आरजीव्ही थिएटरच्या माध्यमातून इरॉटिक, क्राईम, हॉरर आदी फिल्म रिलीज करण्यात येतील. मात्र, शॉर्ट फिल्म सिंगल एक्स सेंसॉर बोर्डला समर्पित करीत असल्याचे रामगोपल वर्माने म्हटेल.