रिंकूने 'मदर्स डे'च्या दिल्या शुभेच्छा

जगभरात आज मदर्स डे साजरा केला जातोय. सैराट या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री रिकू राजगुरुनेही मदर्स डेच्या निमित्त एक फोटो फेसबुकवर शेअर केलाय.

Updated: May 8, 2016, 09:29 AM IST
रिंकूने 'मदर्स डे'च्या दिल्या शुभेच्छा title=

मुंबई : जगभरात आज मदर्स डे साजरा केला जातोय. सैराट या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री रिकू राजगुरुनेही मदर्स डेच्या निमित्त एक फोटो फेसबुकवर शेअर केलाय.

यात तिने 'माझं कुटुंब....मला घडवणारे माझे आई-वडील !!!! यांना तर लाईक मिळायलाच हवा आज ! Happy Mother's day' असं म्हटलंय.

रिंकू आणि आकाश ठोसर यांच्या अभिनयाने सजलेल्या सैराटला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळतेय. बॉक्स ऑफिसवर तर या सिनेमाने नवेनवे विक्रम प्रस्थापित केलेत.

आर्ची आणि परश्याची निरागस प्रेम कथा लोकांना चांगलीच भावतेय. तसेच या चित्रपटातील सर्वच गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावलंय.