आर्चीला चित्रपट किंवा सिरीअल्स नाही आवडत

 आपल्या पहिल्याच चित्रपटात सर्वांना याडं लावणारी आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू हिला एखादा चित्रपट किंवा टीव्हीवरील कोणतीही सासू सुनेची मालिका याडं लावत नाही तर तिला कार्टुन शो याडं लावतात. 

Updated: May 12, 2016, 06:12 PM IST
आर्चीला चित्रपट किंवा सिरीअल्स नाही आवडत title=

मुंबई :  आपल्या पहिल्याच चित्रपटात सर्वांना याडं लावणारी आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू हिला एखादा चित्रपट किंवा टीव्हीवरील कोणतीही सासू सुनेची मालिका याडं लावत नाही तर तिला कार्टुन शो याडं लावतात. 

कोणता चित्रपट आवडतो

एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिला प्रश्न विचारण्यात आला. तुला कोणता चित्रपट आवडतो, किंवा तू यापूर्वी कोणते चित्रपट पाहिलेत. 
या प्रश्नावर रिंकू राजगुरू म्हणाली, खरं सांगू यापूर्वी मी जास्त चित्रपट पाहिले नाही. 

नागराजने मिळवले उत्तर 

सर्वांनी तिला प्रश्न विचारले तेव्हा आपलं उत्तर कसं सांगू असं रिंकूला झालं होतं. पण तिने हळूच नागराज मंजुळे यांना सांगितलं की कार्टुन पाहायला आवडतं. 

वयानुसार आवड

या प्रश्नावर रिंकून एक दोन चित्रपटांची नावे सांगितली असती पण तीने प्रामाणिकपणे आपल्या वयानुसार आपली आवड सांगितली. ती केवळ १५ वर्षांची असून ती नुकतीच नववीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.