'सैराट'मधील आर्ची अर्थात प्रत्यक्षात रिंकू पाहा कशी आहे?

पडद्यावरील आर्ची तुम्ही पाहिलीत. मात्र, प्रत्यक्ष जीवनात ती कशी आहे, हे तुम्हाला माहित आहे का?

Updated: Jun 23, 2016, 11:42 AM IST
'सैराट'मधील आर्ची अर्थात प्रत्यक्षात रिंकू पाहा कशी आहे? title=

मुंबई : नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' सिनेमाचे गारुड काही केल्या संपत नाही. याच सिनेमाने एका रात्रीत आर्ची आणि परशा स्टार झालेत. आर्ची अर्थात रिंकू राजगुरु आणि परशा अर्थात आकाश ठोसर. पडद्यावरील आर्ची तुम्ही पाहिलीत. मात्र, प्रत्यक्ष जीवनात ती कशी आहे, हे तुम्हाला माहित आहे का?

रिंकूने खूप  धपाटे खाल्लेत

रिंकूच्या गोड आठवणी तिच्या आईने आपल्या शब्दात व्यक्त केल्यात. तसेच ती खूप हट्टी मुलगी होती. तिने माझा-बाबांचा मार खल्ला आहेच. शिवाय हट्टामुळे घरातील मंडळींचाही. तिने एखादी गोष्ट करायची ठरवली तर ती तेच करते, असे तिच्या आईने एका टिव्ही न्यूज चॅनेला सांगितले.

रिंकूचा जन्म झाला आणि...

रिंकूचा जन्म झाला त्यावेळी घरातील सर्वांना आनंद झाला. तिला घेण्यासाठी सर्वांची थडपड व्हायची. कोणी घ्यायचे याचीच स्पर्धा लागायची. लहानपणी तिचे डोळे, केस सुंदर होते. मी जरी तिची आई असले तरी ती खूप सुंदर होती. रिंकू लहानपणी खूप हट्टी होती. तिने कितीही मार खल्ला तरी ती आपली जिद्द सोडायची नाही.

तिचा आणखी एक गुण

तिने शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला. ती डान्सही करते. तिच्यात आणखी एक गुण आहे तो म्हणजे ती छान रांगोळी आणि मेहंदी काढते. तसेच ती बिनधास्त आहे. कॉलनीत ती सर्वांची लाडकी मुलगी आहे. डॅशिंगपणा तिच्याच लहानपणापासून आहे. ती खूप हट्टी आहे. तिने एखादी गोष्ट ठरवली तर ती करते. असा तिचा हट्टी स्वभाव आहे.

रिंकूला ऑफर येत आहेत पण...

रिंकूचे आम्ही आई-वडील शिक्षक आहोत. तिला जे करायचेय ते तिला करु दे. आधी शिक्षण महत्वाचे आहे. आता तिचे दहावीचे वर्ष आहे. ते महत्वाचे आहे. शिक्षणाबरोबर तिला अभिनयही करायचाय. बघुया अजून तसे काही ठरविलेले नाही. तिला ऑफर येत आहेत. मात्र, रिंकूला डॉक्टर व्हायचंय. तिला प्राणी खूप आवडतात. त्यामुळे तिचे स्वप्न आहे ते प्राण्यांचे डॉक्टर होण्याचे.

अभियनाची चुणूक त्यांच्यामुळे बाहेर

ती चंदन आहे. चंदनाला त्याचे गुण सांगावे लागत नाहीत. जसा चंदनाचा सुगंध दरवळतो. तसे रिंकूचे झालेय. तिच्यातील अभिनय गुण नागराज मंजुळे यांनी बाहेर काढलेत, अशी कबुली तिच्या आईने रिंकूबद्दल भरभरून बोलताना दिली.