'कपूर अँड सन्स'साठी ऋषी कपूर यांचा नवा लूक

बॉलीवूड अभिनेता ऋषी कपूर यांचा नवा लुक समोर आलाय. कपूर अँड सन्स या चित्रपटात ते या लूकमध्ये दिसणार आहेत. ट्विटरवरुन ऋषी कपूर यांनी आपला फोटो पोस्ट केलाय. 

Updated: Feb 2, 2016, 02:53 PM IST
'कपूर अँड सन्स'साठी ऋषी कपूर यांचा नवा लूक title=
सौजन्य - ट्विटर

मुंबई : बॉलीवूड अभिनेता ऋषी कपूर यांचा नवा लुक समोर आलाय. कपूर अँड सन्स या चित्रपटात ते या लूकमध्ये दिसणार आहेत. ट्विटरवरुन ऋषी कपूर यांनी आपला फोटो पोस्ट केलाय. 

या चित्रपटात ८५ वर्षाच्या वृद्धाची भूमिका साकारणार आहेत. हॉलीवूडचे मेकअप आर्टिस्ट ग्रेग कॅनम यांनी हा मेकअप केलाय. हा मेकअप करण्यासाठी दररोज पाच तास लागतात. या मेकअपसाठी तब्बल दीड करोड रुपये खर्च केलेत. 

जेव्हा करण आणि शकुन मला भेटले तेव्हा मी कॅनम यांचे नाव सुचवले. मी त्यांच्याबाबत खूप काही ऐकले होते. ते तयार होतील की नाही याबाबत खात्री नव्हती. मात्र करण त्यासाठी तयार झाला.