'रुस्तम'च्या यूनिफॉर्ममध्ये आहेत या 8 चुका

अक्षय कुमारचा रुस्तम हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. 

Updated: Aug 18, 2016, 08:37 AM IST
'रुस्तम'च्या यूनिफॉर्ममध्ये आहेत या 8 चुका  title=

मुंबई : अक्षय कुमारचा रुस्तम हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. 1959 च्या नानावटी मर्डर केसवर हा चित्रपट आधारित आहे. नेव्हीच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेत असलेल्या रुस्तम पावरीनं केलेल्या खुनाभोवती या चित्रपटाची कथा फिरते.

खऱ्या घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये मात्र रुस्तम पावरी म्हणजेच अक्षय कुमारच्या यूनिफॉर्ममध्ये आठ चुका आहेत. 1959 मधली कथा दाखवताना अक्षय कुमारच्या यूनिफॉर्ममध्ये दाखवण्यात आलेले स्टार्स हे नेव्हीच्या अधिकाऱ्यांना उशीरा देण्यात आलेले आहेत. संदीप उन्नीनाथन यांनी रुस्तममधल्या या चुका ट्विटरवर शेअर केल्या आहेत.