नागराजने म्हणून अार्चीला बुलेट शिकवली...

सध्या 'सैराट'चीच चर्चा सर्वत्र आहे. मात्र, सैराटच्या पडद्यामागील कधीही न ऐकलेल्या काही रंजक गोष्टी चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत. अशीच एक उत्सुकता अार्चीला बुलेट का शिकवली याची आहे.

Updated: May 6, 2016, 11:03 AM IST
नागराजने म्हणून अार्चीला बुलेट शिकवली... title=

मुंबई : सध्या 'सैराट'चीच चर्चा सर्वत्र आहे. मात्र, सैराटच्या पडद्यामागील कधीही न ऐकलेल्या काही रंजक गोष्टी चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत. अशीच एक उत्सुकता अार्चीला बुलेट का शिकवली याची आहे.

‘फँड्री’च्या प्रदर्शनानंतर 

दिग्दर्शनक नागराज पोपराव मंजुळे यांनी सिनेमा रिअल वाटावा म्हणून कोणताच सेट उभा न करता, गावातच या सिनेमाचे शूटिंग केले. तर ‘फँड्री’च्या प्रदर्शनानंतर महिन्याभराच्या आत ‘सैराट’च्या मोर्चेबांधणीस सुरुवात केली होती.

ही काय, सिनेमाची हिरोईन?

सैराटची नायिका बिनधास्त वाटावी म्हणून नागराज यांनी अार्ची अर्थात रिंकू राजगुरुला बुलेट चालवण्यास शिकवले. सैराटसाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू (खरे नाव प्रेरणा राजगुरु) हिची नागराज मंजुळे यांनी चित्रपटासाठी निवड केली तेव्हा ती सातवी इयत्तेत शिकत होती. बरोबर एक वर्षांनी तिला कॉल केला. त्यानंतर तिला संगितकार अजय-अतुल यांच्यासमोर उभे केले होते, त्यावेळी त्यांनाही धक्का बसला होता. ही काय, सिनेमाची हिरोईन असे त्यांनी म्हटलं होतं. मात्र, आता सिनेमातील काम पाहून ते तिचे कौतुक करीत आहेत. छान काम केल्याची पोचपावती अजय-अतुल गोगावले यांनी दिलेय.

 सैराट हा अस्सल मराठी शब्द

अजय-अतुलने सैराट या सिनेमासाठी गाण्यांचे रेकॉर्डिंग भारताबाहेर नावाजलेल्या सिंफनी स्टुडीओत केलेय. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आजवर निवड झालेला केवळ चौथा मराठी चित्रपट म्हणून सैराटला मान मिळाला आहे. सैराट हा अस्सल मराठी शब्द असून त्याचा अर्थ सुसाट, वेगवान असा होतो, संत तुकारामांच्या अभंगांमध्ये सैराट शब्दाचा उल्लेख आला आहे.