'सैराट'ची ४ दिवसात रेकॉर्डब्रेक कमाई

बॉक्स ऑफिसवर सिनेमाचा नवा रेकॉर्ड

Updated: May 4, 2016, 01:44 PM IST
'सैराट'ची ४ दिवसात रेकॉर्डब्रेक कमाई title=

मुंबई : झी स्टुडिओजची निर्मिती असलेला, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग मिळालं आहे. सैराटने पहिल्या ४ दिवसांत सुमारे १५ कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने एक नवा रेकॉर्ड केलाय.

महाराष्ट्रभर जवळपास ४०० हून अधिक चित्रपटगृहांमध्ये ९००० शोजसह सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. सैराटचे अनेक ठिकाणी शो अजूनही हाऊसफुल आहेत.

ओपनिंगच्या दिवशी या चित्रपटाने तब्बल ३.५५ कोटींची जबरदस्त कमाई केली. दुसऱ्या दिवशी शनिवारी ३.७० आणि तिसऱ्या दिवशी रविवारी सैराटने ४.८५ कोटींची कमाई केली तर सोमवारी सिनेमाने २.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

याआधी टाईमपास २, लयभारी आणि नटसम्राट या तिनही सिनेमांनी दहा कोटींचा आकडा पार केला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर तुफान चालणाऱ्या सैराटने यांचाही विक्रम मोडीत काढला आहे. सिनेमागृहांमध्ये झिंग झिंग झिंगाट हे गाणं प्रेक्षकांचं आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे.