आता दुबईकर होणार सैराटमय

सैराट या चित्रपटाने महाराष्ट्रभर धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट दुबईवारी करण्यास सज्ज झालाय.

Updated: May 20, 2016, 12:35 PM IST
आता दुबईकर होणार सैराटमय title=
सौजन्य - ट्विटर

मुंबई : सैराट या चित्रपटाने महाराष्ट्रभर धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट दुबईवारी करण्यास सज्ज झालाय.

मराठी सिनेसृष्टीतील अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करणारा सैराटचे दुबईमध्ये शोज होणार आहेत. २६, २७ आणि २८ मे रोजी सैराट दुबईमध्ये दाखवला जाणार आहे. 

२७ मेला स्पेशल स्क्रीनिंग होणार आहे. या चित्रपटाचे २ शहरांमध्ये २२ शोज होणार आहेत.

आर्ची आणि परश्याची लव्हस्टोरी असलेल्या नागराज मंजुळे यांच्या सैराटला पहिल्या दिवसापासूनच लोकांनी डोक्यावर घेतलं. या चित्रपटाने अपेक्षेपेक्षाही अधिक लोकप्रियता मिळवली. चित्रपटातील सर्व कलाकार, त्यांचे संवाद, गाणी लोकांमध्ये चांगलीच हिट झाली.