सैराटची टीम 'द कपिल शर्मा शो'मध्ये

परश्या आणि आर्चीच्या केमिस्ट्रीने सगळ्यांनाच भूरळ घातली आहे.

Updated: Jun 3, 2016, 09:55 PM IST
सैराटची टीम 'द कपिल शर्मा शो'मध्ये title=

मुंबई : बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढत सैराट सिनेमानं नवीन विक्रम प्रस्थापित केलाय. सैराटनं आता पर्यंत 80कोटींचा गल्ला जमवलाय. सर्वाधिक कमाई करणारा सैराट हा पहिला मराठी ब्लॉकबस्टर सिनेमा ठरलाय. नागराज मंजूळे दिग्दर्शित या सिनेमातील परश्या आणि आर्चीच्या केमिस्ट्रीने सगळ्यांनाच भूरळ घातली आहे.

सैराट या मराठी सिनेमाने बॉलिवूडमधील कलाकारांना देखील दखल घ्यायला लावली. सातासमुद्रापार पोहोचलेल्या सैराटची टीम आता 'द कपिल शर्मा शो'मध्ये देखील हजेरी लावणार आहे.

हा शो कधी टेलिकास्ट होणार आहे याबाबतची अधिकृत माहिती अजून आलेली नाही मात्र या एपिसोडचे शूटिंग येत्या रविवारी होणार आहे.  पहिल्यांदाच कोणतातरी मराठी सिनेमाचं प्रमोशन कपिल शर्माच्या हिंदी शोमध्ये होणार आहे. हा देखील एक अनोखा रेकॉर्ड आहे. याआधी शाहरुख खान त्याच्या हिंदी सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी चला हवा येऊ द्या या मराठी शोमध्ये आला होता.