दबंग सलमानचं अर्पिताला 'खास गिफ्ट'

दबंग सलमानने आपली बहिण अर्पिताला एक खास पेटिंग गिफ्ट केलं आहे. ,सलमान हा बॉलीवूडचा अभिनेता म्हणून ओळखला जात असला, तरी तो पेटिंगचाही चांगला जाणकार आहे.  सलमानने नुकतंच त्याची लाडकी बहिण अर्पिताला एक पेंटिंग गिफ्ट दिलं आहे. आणि हे पेटिंग स्वत: सलमान खानने रंगवलंय.

Updated: Mar 12, 2015, 02:21 PM IST
दबंग सलमानचं अर्पिताला 'खास गिफ्ट' title=

मुंबई : दबंग सलमानने आपली बहिण अर्पिताला एक खास पेटिंग गिफ्ट केलं आहे. ,सलमान हा बॉलीवूडचा अभिनेता म्हणून ओळखला जात असला, तरी तो पेटिंगचाही चांगला जाणकार आहे.  सलमानने नुकतंच त्याची लाडकी बहिण अर्पिताला एक पेंटिंग गिफ्ट दिलं आहे. आणि हे पेटिंग स्वत: सलमान खानने रंगवलंय.

  
सलमाननेच पेंटिंगची थीम ठरवली आहे. या पेंटिंगमध्ये नमाज पढण्याचे विविध प्रकार दाखवण्यात आलेत. सलमानने रेखाटलेलं हे पेंटिंग अर्पिताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलंय. पेंटिंगच्या कॅप्शनमध्ये अर्पिताने सलमानला मेन्शन केलं असून त्याचं प्रचंड कौतुक केलंय.
 
ईदच्या मुहूर्तावर 'बजरंगी भाईजान' रिलीज होणार आहे. सलमान खान दिग्दर्शक कबीर खानच्या 'बजरंगी भाईजान'मध्ये दिसणार आहे. या सिनेमात सलमानसोबत करीना कपूर आहे. या चित्रपटात एक मुस्लिम मुलगा आणि एक ब्राह्मण मुलीची प्रेमकहाणी आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.