लुलियासाठी सलमान बांधतोय शानदार फार्म हाऊस

सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लुलिया वंतुर यांची लव्हस्टोरी सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीचा चर्चेचा विषय बनलीये. 

Updated: Jul 23, 2016, 11:04 AM IST
लुलियासाठी सलमान बांधतोय शानदार फार्म हाऊस title=

मुंबई : सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लुलिया वंतुर यांची लव्हस्टोरी सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीचा चर्चेचा विषय बनलीये. 

दोघांची फ्रेण्डशिप दिवसेंदिवस बहरत असल्याचीही जोरदार चर्चा आहे. सलमान म्हणे आता या लुलियासाठी गोराईमध्ये एक शानदार फार्म हाऊस बांधतोय. 

याबाबत त्याने लुलियाची खास आवडनिवड यात जपलीये असंही सांगण्यात येतंय. आता लुलियासोबत सलमान लग्नाच्या बेडीत कधी अडकतोय याचीच उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागलीये.