सलमान खानने कॅटरिनाला दिलं सरप्राईज

कॅटरिना आणि रणबीर कपूर यांच्यात ब्रेकअप सलमान खानमुळे झाला अशा चर्चा रंगल्या आहेत. कॅटरिनासोबत पुन्हा सलमान एका हॉटेलमध्ये दिसला होता. त्यामुळे सलमान आणि कॅटरिना यांच्यात जवळीकता वाढली असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे.

Updated: Feb 2, 2016, 10:21 PM IST
सलमान खानने कॅटरिनाला दिलं सरप्राईज title=

मुंबई : कॅटरिना आणि रणबीर कपूर यांच्यात ब्रेकअप सलमान खानमुळे झाला अशा चर्चा रंगल्या आहेत. कॅटरिनासोबत पुन्हा सलमान एका हॉटेलमध्ये दिसला होता. त्यामुळे सलमान आणि कॅटरिना यांच्यात जवळीकता वाढली असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे.

सलमान खान याच्या भेटीनंतरच रणबीर आणि कॅटरिनाचा ब्रेकअप झाला होता. त्यानंतर सलमान खानने आता कॅटरिनाला एक सरप्राईज दिल्याची चर्चा रंगली आहे. सलमान खानने अचानक एका शोला भेट देऊन कॅटरिनाला सरप्राइज केले.

सलमानने याआधी 'बिग बॉस' शोमध्ये कॅटरिनाचे भरपूर कौतूक केले होते. 'फितूर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कॅटरिना बिझी आहे. याच प्रमोशनचा भाग म्हणून ती 'कॉमेडी लाईव्ह'च्या सेटवर पोहोचली होती. पण कोणालाही कधी वाटणार नाही अशा ठिकाणी सलमानने हजेरी लावली. त्यामुळे कॅटरिनासह तेथे उपस्थित सगळेच आश्चर्य चकित झाले.