सलमान खानने 'ट्यूबलाईट' १३२ कोटीला विकला

चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अजून ३ महिन्यांचा अवधी आहे. पण त्याआधीच हा सिनेमा विक्रम मोडण्यासाठी तयार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 22, 2017, 01:20 PM IST
सलमान खानने 'ट्यूबलाईट' १३२ कोटीला विकला title=

मुंबई : रिलीजआधी सलमान खानच्या 'ट्यूबलाईट' सिनेमाने विक्रम केला आहे.  कारण 'ऑल इंडिया डिस्ट्रिब्यूशन'ने सर्व अधिकार 'एनएच स्टूडिओ'ला १३२ कोटी रुपयांत विकले आहेत. त्यामुळे हा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. कारण याआधी शाहरुख खानचा ‘दिलवाले’ विक्रमी १२५ कोटी रुपयांमध्ये विकला होता.

 'ट्यूबलाईट' अभिनेता सलमान खानच्या आगामी सिनेमाविषयी उत्सुकता आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अजून ३ महिन्यांचा अवधी आहे. पण त्याआधीच हा सिनेमा विक्रम मोडण्यासाठी तयार आहे.

'ट्यूबलाईट' चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री चीनमधील असून तिचं नाव जूजू आहे. तिने अनेक आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्येही काम केलं आहे.'ट्यूबलाईट'ची कथा भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित असल्याचं म्हटलं जातं.

दिग्दर्शक कबीर खानचा सलमानसोबतचा हा तिसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी 'एक था टायगर' आणि 'बजरंगी भाईजान' यांसारखे सुपरहिट चित्रपट केले होतं. आता ट्यूबलाईटकडून प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.

कबीर खान दिग्दर्शित 'ट्यूबलाईट' सिनेमात शाहरुख खानने कॅमियो केला आहे. कतरिना कैफच्या बर्थ डे पार्टीत दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर अनेक वर्षांनी दोघांमध्ये पुन्हा मैत्री झाली आहे.