सलमान खान गर्लफ्रेंडसोबत शोमध्ये दिसणार एकत्र

सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लुलिया वंतूर हे दोघेही बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या कारणावरून चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा दोघांची चर्चा सुरू झाली आहे. दोघेही एका शोमध्ये एकत्र दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

Updated: Jan 20, 2016, 09:34 PM IST
सलमान खान गर्लफ्रेंडसोबत शोमध्ये दिसणार एकत्र title=

मुंबई : सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लुलिया वंतूर हे दोघेही बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या कारणावरून चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा दोघांची चर्चा सुरू झाली आहे. दोघेही एका शोमध्ये एकत्र दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

एक स्वीडिश प्रोड्युसर 'द फार्महाऊस' या रिआलिटी शोवर काम करत आहेत. हा शो सलमान आणि लुलिया होस्ट करणार असल्याचं सूत्रांची माहिती आहे. हा शो वर्षाच्या शेवटपर्यंत येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

४० देशांमध्ये या शोचं टेलिकास्ट होणार असून यामध्ये १२ सेलिब्रिटी सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. सलमानला जेव्हा या शोबद्दल माहित पडलं त्याने तेव्हा त्याने हा शो भारतातही टेलिकास्ट करण्याची इच्छा वर्तवली. 

सध्या लुलिया याच शोच्या रोमान वर्जनची शुटींग करत आहे. तर सलमानही त्याच्या सुल्तान या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहे.

लुलिया आणि सलमान यांच्या अफेअरची चर्चा सगळीकडेच आहे. त्यामुळे आता हे दोघे एकत्र दिसणार असल्याने सिने रसिकांना चर्चेसाठी आणखी एक मुद्दा मिळाला आहे.