सलमानने केले अनंत अंबानीचे कौतुक

अवघ्या १८ महिन्यांत तब्बल १०८ किलो वजन घटवण्याची किमया साधणाऱ्या अनंत अंबानीच्या प्रयत्नावर बॉलीवूडचा सलमान खानही खुश आहे. 

Updated: Apr 11, 2016, 11:41 AM IST
सलमानने केले अनंत अंबानीचे कौतुक title=

मुंबई : अवघ्या १८ महिन्यांत तब्बल १०८ किलो वजन घटवण्याची किमया साधणाऱ्या अनंत अंबानीच्या प्रयत्नावर बॉलीवूडचा सलमान खानही खुश आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून अनंत अंबानी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होतोय. अनंत अंबानीच्या या मेहनतीची चर्चा सर्वत्र सुरु आहे. गेल्या १८ महिन्यांत त्याने तब्बल १०८ किलो वजन घटवलेय. आयपीएलदरम्यान अनंतच्या लुकची सर्वत्र चर्चा सुरु होती. 

सलमाननेही ट्विटरवर अनंतच्या मेहनतीवर आनंद व्यक्त केलाय. अनंत अंबानीला पाहून मी खुश आहे. १०८ किलो वजन कमी करणे हे काही सोपे काम नाही. मी त्याचा खूप आदर करतो, असे सलमान ट्विटरवर म्हणालाय. 

गेल्या दीड-दोन वर्षांपासून वजन कमी करण्यासाठी तो अथक मेहनत घेतोय. अनंत रोज २१ किमी चालत असे. त्यासोबतच योगा आणि वेट ट्रेनिंगसह कार्डिओ एक्सरसाईजही करत असे.