'सुल्तान'नं अरिजीतच्या जखमेवर मीठ चोळलं...

सलमान खानच्या 'सुल्तान' या सिनेमात अरिजीत सिंहनं गायलेलं गाणं सलमान खाननं पुन्हा एकदा एका दुसऱ्या गायकाकडून गाऊन घेतलंय. 

Updated: Jun 8, 2016, 08:25 AM IST
'सुल्तान'नं अरिजीतच्या जखमेवर मीठ चोळलं...  title=

नवी दिल्ली : सलमान खानच्या 'सुल्तान' या सिनेमात अरिजीत सिंहनं गायलेलं गाणं सलमान खाननं पुन्हा एकदा एका दुसऱ्या गायकाकडून गाऊन घेतलंय. 

सलमाननं मंगळवारी ट्विट करून आपलं 'जगघुमया' या गाण्याचं एक व्हर्जन लॉन्च केलं. 'राहत फतेह अली खान यांच्या 'जगघुमया' वर्जनची मजा घ्या...' असं ट्विट सलमाननं केलंय. 

काही दिवसांपूर्वीच, अरिजीतनं सोशल मीडियावर एक पत्र लिहून सलमानची माफी मागितली होती... सोबतच त्यानं 'सुल्तान'मधून आपलं गाणं हटवू नये, अशी विनंतीही सलमानकडे फेसबुकवर केली होती. नंतर अरिजीतनं आपली पोस्ट डीलीट केली. 

पण यानंतरही सलमाननं अरिजीतवर काही दया-मया दाखवलेली दिसत नाही.