सलमान - शाहरुखचा 'बिग बॉस'च्या घरातही हंगामा!

'बिग बॉस - सीझन ९' त्यात सहभागी झालेल्या स्पर्धकांमुळे फारसा चर्चेत आला नसला तरी यंदाचा सलमान - शाहरुख या जोडगोळीला एकत्र पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय.

Updated: Nov 25, 2015, 02:18 PM IST
सलमान - शाहरुखचा 'बिग बॉस'च्या घरातही हंगामा! title=

मुंबई : 'बिग बॉस - सीझन ९' त्यात सहभागी झालेल्या स्पर्धकांमुळे फारसा चर्चेत आला नसला तरी यंदाचा सलमान - शाहरुख या जोडगोळीला एकत्र पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय.

होय, पुढच्या आठवड्यात या कार्यक्रमाचा होस्ट सलमान खानसोबतच शाहरुख खानही या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. आपला आगामी सिनेमा 'दिलवाले'च्या प्रमोशनसाठी शाहरुख या बिग बॉसच्या घरात दाखल होणार आहे. 

या एपिसोडचं शूटींग पुढच्या आठवड्यात पार पडणार आहे. आपले अनुभव बिग बॉसच्या स्पर्धकांसोबत शेअर करण्यासाठी सलमाननं खास शाहरुखला आमंत्रण दिलंय. सोबतंच, या दोन्ही खान्सचा बॉलिवूडमधला आत्तापर्यंतचा प्रवासही त्यांच्याच तोंडून प्रेक्षकांना ऐकता येईल. 

या कार्यक्रमात अभिनेत्री काजोल आणि 'दिलवाले'च्या टीममधले इतर सदस्यही सहभागी होणार का? हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. 

काही दिवसांपूर्वीच शाहरुखच्या वाढदिवसानिमित्तानं अर्ध्या रात्री सलमाननं त्याला सरप्राईज देत भेट दिली होती.... आणि 'प्रेम रतन धन पायो'च्या म्युझिकवर या दोघांनी एक डबस्मॅशही शेअर केला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.