असहिष्णुता प्रकरण : आमिरच्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने मांडले

 अभिनेता शाहरूख खानने आपला सहकलाकार आमिर खान याचे समर्थन केले आहे. एक आठवड्यापूर्वी आमिर खान चर्चेत आला होता. त्याने एका मुलाखतीत देशातील वाढत्या असहिष्णुतेवर वक्तव्य केले होते. 

Updated: Dec 1, 2015, 12:58 PM IST
असहिष्णुता प्रकरण : आमिरच्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने मांडले title=

मुंबई :  अभिनेता शाहरूख खानने आपला सहकलाकार आमिर खान याचे समर्थन केले आहे. एक आठवड्यापूर्वी आमिर खान चर्चेत आला होता. त्याने एका मुलाखतीत देशातील वाढत्या असहिष्णुतेवर वक्तव्य केले होते. 

न्यूज चॅनल आयबीएनशी बोलताना शाहरूख खान म्हणाला की आमिर खानच्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने मांडले आहे. त्याच्यानुसार जर कोणी सोशल मीडियावर असेल तर आमिरसाठी त्यांनी आवाज उठवला पाहिजे. 

तो सोशल मीडिया संदर्भात म्हटले की, सध्या सोशल मीडियावर काही लोक खूप उग्र पद्धतीने विचार करीत आहेत. लवकरच ते कोणत्याही निष्कर्षावर पोहचून जातात. 

सोशल मीडियातील लोकांना उत्तर देणे किंवा नाही देणे दोन्ही अडचणीचे ठरते, असे शाहरूख म्हणाला. अशा लोकांना उत्तर दिले नाही तर ते शिव्या देऊ लागतात. शाहरूख म्हटला की कोणालाही आपली देशभक्ती सिद्ध करण्याची गरज नाही आहे. 

शाहरूखला असहिष्णूतेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो बोलत होता. 

शाहरूख म्हटला एखादा नेता धर्मनिरपेक्षतेबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करतो त्याला मान्यता मिळते पण एखादा कलाकार काही बोलतो तेव्हा त्याचे वेगळे अर्थ काढण्यात येतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.