'किंग खान'ची प्रॉपर्टी किती आहे, जाणून घ्या...

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची लाईफस्टाईल एखाद्या 'बादशाह'पेक्षा कमी नाही. जगभरातील श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीतही त्याचं नाव आहे. पण, त्याची नेमकी प्रॉपर्टी किती आहे याची तुम्हाला कल्पना आहे का... 

Updated: Jun 2, 2016, 08:08 PM IST
'किंग खान'ची प्रॉपर्टी किती आहे, जाणून घ्या...  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची लाईफस्टाईल एखाद्या 'बादशाह'पेक्षा कमी नाही. जगभरातील श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीतही त्याचं नाव आहे. पण, त्याची नेमकी प्रॉपर्टी किती आहे याची तुम्हाला कल्पना आहे का... 

शाहरुख केवळ अभिनय करून बॉलिवूडमधून पैसे कमावतो असा तुमचा अजुनही समज असेल तर तुम्ही चुकीचे आहात. त्याचे अनेक साईड बिझनेसही आहेत. 

१. रेड चिली एन्टरटेन्मेंटचाही मालकही शाहरुख खानच आहे. या बॅनरखाली अनेक सिनेमे बॉलिवूडमध्ये दाखल होताना दिसतात.

२. मुंबईमध्ये लहान मुलांसाठी असलेल्या एन्टरटेन्मेंट पार्क 'किडझेनिया' शाहरुखच्याच मालकीचं आहे. 

३. याशिवाय शाहरुख अनेक स्टेज शो आणि एन्डोर्समेंट कार्यक्रम करोतो. यासाठी तो चांगलंच मानधन घेतो. 

४. शाहरुख खानचा क्रिकेटमधला इंटरेस्ट तुम्ही गेल्या काही वर्षांत पाहिलाच असेल... आयपीएलच्या 'कोलकाता नाईट रायडर्स'चा मालकही शाहरुखच आहे. 

५. शाहरुखनं बरीच गुंतवणूकही करून ठेवलीय. शाहरुखचे देशात आणि परदेशात अनेक आलिशान बंगलेही आहेत. 

६. स्थावर मालमत्तेत मुंबईतील मुंबई हा बंगला एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही. 

७. दुबईतील पाम जुमेराह इथे शाहरुख खानचा विला के-९३ हा राजवाडा १४,००० स्क्वेअर फीटमध्ये फैलावलेला आहे. याची किंमत जवळपास १८ करोड रुपये आहे. यामध्ये दोन रिमोट कंट्रोल्ड गॅरेज, एक खाजगी बीच आणि प्रायव्हेट पूलदेखील आहे. 

८. लंडनच्या सेंट्रल एरियामध्ये आपला मुलगा आर्यन याच्यासाठी एक महागडं अपार्टमेंटदेखील घेऊन ठेवलंय. याची किंमत जवळपास १९५ करोड रुपये सांगितली जाते.

९. शाहरुख जवळपास ४ हजार करोडचा मालक आहे. भारतातील सर्वांत श्रीमंत अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. 

१०. शाहरुखचा गाड्यांचा नादही तुम्हाला ठाऊक असेलच... त्याच्याकडे ऑडी ६, ऑडी ए ६, बीएमडब्ल्यू ६ सीरीज, लँड क्रूजर, भलीमोठी व्हॅनिटी व्हॅन अशा महागड्या गाड्याही आहेत.