शाहरूख खानकडे एका वस्तूसाठी पैसे नाहीत

बॉलीवूडचा अभिनेता शाहरुख खान सध्या अडचणीत आहे.

Updated: Feb 3, 2016, 03:57 PM IST
शाहरूख खानकडे एका वस्तूसाठी पैसे नाहीत title=

मुंबई : बॉलीवूडचा अभिनेता शाहरुख खान सध्या अडचणीत आहे. शाहरूखकडे गाडी, बंगला, प्रसिध्दी आहे पण त्याला त्याच्याकडे एक वस्तू नसल्याची खंत आहे. ती वस्तू घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नसल्याचं म्हटलं आहे.

शाहरुख खान म्हणतो की, 'मला विमान खरेदी करायचे आहे. परंतु माझ्याकडे त्याच्यासाठी पैसा नाही. माझा सर्व पैसा चित्रपट निर्मितीमध्ये गुंतला आहे. मला स्वतःच्या विमानातून फिरायचे आहे, कारण माझ्याकडे भरपूर काम आहे. विमान खरेदीसाठी आवश्यक धन माझ्याकडे नाही.

बादशहा खान सलग दोन दशकांपासून बॉलीवूडवर राज्य करतोय. शाहरूख आता त्याच्या दोन आगामी चित्रपटांच्या कामामध्ये बिझी आहे.