श्रद्धा कपूर असणार 'गोलमाल 4' ची अभिनेत्री

'गोलमाल 4' या सिनेमात लीड अॅक्टर अजय देवगनबरोबर अभिनेत्री श्रद्धा कपूर दिसणार आहे. 

Updated: Aug 26, 2016, 01:55 PM IST
श्रद्धा कपूर असणार 'गोलमाल 4' ची अभिनेत्री title=

मुंबई: 'गोलमाल 4' या सिनेमात लीड अॅक्टर अजय देवगनबरोबर अभिनेत्री श्रद्धा कपूर दिसणार आहे. 

'गोलमाल 4'मध्ये दीपिका किंवा आलिया अजय देवगनची अभिनेत्री असणार याची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू होती. पण आता 'गोलमाल 4' मध्ये अजय देवगनबरोबर श्रद्धा कपूर झळकणार आहे.  

याआधी 'गोलमाल 3' या सिनेमात करिना कपूरने अजय देवगनच्या अभिनेत्रीची भुमिका केली होती. पण आता 'गोलमाल 4'साठी दिग्दर्शक रोहित शेट्टीला तरुण अभिनेत्री हवी आहे.
    
'गोलमाल 4' चे चित्रिकरण डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. 'गोलमाल 4'मध्ये पुन्हा एकदा अजय देवगन, तुषार कपूर, श्रेयस तळपदे आणि अरशद वारसी हे अभिनेते एकत्र दिसणार आहे.