श्रेयस तळपदेची नवी आणि आव्हानात्मक भूमिका

बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला गाठणारा ग्रँड मस्तीचा लवकरच दुसरा पार्ट येणार आहे. सेकंड पार्टमध्ये देखील पहिल्या पार्टमधील विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख, आफताब शिवदासनी हे अभिनेते दिसणार आहेत. पण यांच्याबरोबर मराठमोळा श्रेयस तळपदेही नव्या भूमिकेत झळकणार आहे.

Updated: Jun 8, 2016, 01:28 PM IST
श्रेयस तळपदेची नवी आणि आव्हानात्मक भूमिका title=

मुंबई : बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला गाठणारा ग्रँड मस्तीचा लवकरच दुसरा पार्ट येणार आहे. सेकंड पार्टमध्ये देखील पहिल्या पार्टमधील विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख, आफताब शिवदासनी हे अभिनेते दिसणार आहेत. पण यांच्याबरोबर मराठमोळा श्रेयस तळपदेही नव्या भूमिकेत झळकणार आहे.

श्रेयसचा हा नवा अंदाज

श्रेयसने आजवर अनेक नवनवीन भूमिका साकारल्यात पण यावेळी त्याची ही भूमिका जितकी नवीन आहे तितकीच आव्हानात्मकदेखील असणार आहे.
श्रेयस जे पात्र साकारणार आहे त्याचे नाव असणार आहे जिंगलो आणि तो पुरुष वेश्याव्यवसाय करणाऱ्याच्या भूमिकेत आहे.

श्रेयससोबतच फिल्ममध्ये आणखी तीन हिरो आणि हिरॉईन असणार आहेत. इंद्र कुमार दिग्दर्शित ग्रँड मस्तीचे ट्रेलर लवकरच लाँच होणार आहे. त्यात श्रेयसची भूमिका बघायला त्याच्या फॅन्सना नक्कीच कुतूहल असणार आहे.