'भाभीजी' अखेर घरी परतली

कॉमेडी सीरियल 'भाभी जी घर पर है' मधील रौनक अर्थात भाभी जी अखेर आपल्या घरी परतलीये. सीरीयलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेली अंगुरी भाभीच्या रुपात आता शुभांगी अत्रे दिसणार आहे. विभूति जी यांची मेहनत फळाला आली आणि भाभी जी घरी परतली. त्यांनी अंगुरी भाभीला माहेराहून घरी आणण्यासाठी किती प्रयत्न केले होते. 

Updated: Apr 26, 2016, 11:47 AM IST
'भाभीजी' अखेर घरी परतली title=

मुंबई : कॉमेडी सीरियल 'भाभी जी घर पर है' मधील रौनक अर्थात भाभी जी अखेर आपल्या घरी परतलीये. सीरीयलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेली अंगुरी भाभीच्या रुपात आता शुभांगी अत्रे दिसणार आहे. विभूति जी यांची मेहनत फळाला आली आणि भाभी जी घरी परतली. त्यांनी अंगुरी भाभीला माहेराहून घरी आणण्यासाठी किती प्रयत्न केले होते. 

अंगुरी भाभीच्या परत येण्यावर तिचे पती तिवारीजींचे म्हणणे आहे की, अंगुरीच्या घरी येण्याने मला जितका आनंद झाला नसेल त्याहून अधिक पटीने आनंद विभूति जी यांना झालाय. अखेर प्रतीक्षा संपलीये. भाभी जीच्या सेटवर नवी भाभीजी आली आहे. गेले काही दिवस अंगुरी भाभी सीरियलमध्ये नसल्याने प्रेक्षकांसह सेटवरही त्यांची उणीव भासत होती. 

या मालिकेचे दिग्दर्शक म्हणतात, 'भाभी जी घर पर है' या मालिकेत भाभीजी नसल्याने तिची उणीवर भासत नाही. तसेच नवी भाभी जी अर्थात शुभांगी अत्रेसाठी ही भूमिका काही सोपी नव्हती. या मालिकेवरुन सुरु असलेल्या वादानंतर आता शिल्पा शिंदेच्या जागी शुभांगी अत्रे दिसणार आहे. याआधीही चिडीयाघर या मालिकेत शिल्पाच्या जागी शुभांगीने काम केले होते.