सेक्स रॅकेटः अभिनेत्री श्वेताच्या ग्राहकांचा होईल खुलासा

देहव्यापाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या बॉलिवुड अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद आपल्या हायप्रोफाइल ग्राहकांची नावांचा खुलासा करू शकते. 

Updated: Sep 9, 2014, 02:53 PM IST
सेक्स रॅकेटः अभिनेत्री श्वेताच्या ग्राहकांचा होईल खुलासा title=

हैदराबाद : देहव्यापाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या बॉलिवुड अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद आपल्या हायप्रोफाइल ग्राहकांची नावांचा खुलासा करू शकते. 

गेल्या आठवड्यात हैदराबाद पोलिसांनी श्वेताला अटक केले होते. त्यानंतर तिच्या ग्राहकांच्या नावांचा खुलासा करण्यात यावा अशी मागणी होत होती. जे छाप्याच्यावेळी श्वेतासोबत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेताच्या ग्राहकांमध्ये मोठ्या शहरातील मोठ्या बिझनेसमनची नावे सामील आहेत. 

श्वेता के ग्राह‌कों में कई बड़े बिजनेसमैन
 

त्या ग्राहकांनी श्वेता तिच्यासोबत रात्र घालवू शकेल, यासाठी प्रत्येक दलालाला एक-एक लाख रुपये दिले होते. पोलिसांनी ज्यावेळी हैदराबाद येथील बंजारा हिल्स हॉटेलमध्ये छापा मारून श्वेताला पकडले त्यावेळी ती एका बिझनेसमनसोबत आपत्तीजनक स्थितीत होती.

श्वेतासह तिचा दलाल बालू आणि इतर बिझनेसमन सापडले होते. त्यावेळी पोलिसांनी केवळ श्वेता आणि बालू यांची नावे उघड केली होती. ग्राहकांच्या नावाचा खुलासा केला नाही. आता सांगितले जाते की श्वेता आपल्या ग्राहकांचा खुलासा करणार आहे. 

तब श्वेता ने पु‌लिस को दिया था ये बयान
 

२००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या मकडी या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारणाऱ्या श्वेताला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. मकडीनंतर इक्बाल या चित्रपटात तिनं श्रेयस तळपदेच्या बहिणीची छोटेखानी पण महत्त्वाची भूमिका केली होती. चित्रपटांशिवाय एकता कपूरच्या कहानी घर घर की या मालिकेतही तिनं काम केलं होतं. 

श्वेता काही दिवसांपूर्वी एका तेलुगु टीव्ही चॅनलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये एका व्यक्तीसह अंतरंग अवस्थेत कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यावेळी तिने व्हिडिओ चालविणाऱ्या चॅनलविरोधात  केस दाखल केली होती.
आपल्या अटकेनंतर श्वेताने सांगितले, की चुकीच्या चित्रपटांची निवड झाल्याने माझे करिअर संपले. माझ्याकडे पैसे नव्हते. मला माझा कुटुंबाचे पालनपोषण करायचे होते आणि काही मोठी कामे करायची होती. पण सर्व दरवाजे बंद झालीत, अशाच काही लोकांनी पैसे कमविण्यासाठी मला चुकीच्या व्यवसायात येण्यासाठी प्रेरित केले. मला दुसरा रस्ता दिसत नव्हता. त्यामुळे मी हे काम केले. अशी अवस्था माझीच नाही इतर अभिनेत्रींची आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.