सोहा - कुणाल वेगळं व्हायचा विचार करतायत?

बॉलीवूडमध्ये आता ब्रेकअप आणि घटस्फोट इतक्यांचा सिलसिला सुरुच आहे. नुकत्या झालेल्या फरहान - अधुना, रणबीर - कतरिना, हृतिक - सुझान, हृतिक - कंगना या जोड्या तुटल्यानंतर आता आणखी एक जोडी वेगळं होण्याच्या विचारावर येऊन धडकलीय. ही जोडी म्हणजे अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री सोहा अली खान...

Updated: Apr 15, 2016, 11:19 AM IST
सोहा - कुणाल वेगळं व्हायचा विचार करतायत? title=

मुंबई : बॉलीवूडमध्ये आता ब्रेकअप आणि घटस्फोट इतक्यांचा सिलसिला सुरुच आहे. नुकत्या झालेल्या फरहान - अधुना, रणबीर - कतरिना, हृतिक - सुझान, हृतिक - कंगना या जोड्या तुटल्यानंतर आता आणखी एक जोडी वेगळं होण्याच्या विचारावर येऊन धडकलीय. ही जोडी म्हणजे अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री सोहा अली खान...

सोहा - कुणालचं जमेना... 

जसं बॉलीवूड सिनेमांमध्ये दिसतं तशीच सोहा-कुणालच्या लव्हस्टोरीची सुरूवात झाली... भेटी-गाठी, प्रेम आणि नंतर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा निर्णय.... जवळपास दोन वर्ष कुणाल खेमू आणि सोहा अली खान लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. 

त्यानंतर अखेर गेल्या वर्षी हे जोडपं लग्नाच्या बेडीत अडकलं. पण, वर्षभरातच त्यांचं एकमेकांशी पटेनासं झाल्याचं समजतंय. 

'स्पॉटबाय' बेवसाईटनं दिलेल्या बातमीनुसार, सोहा आणि कुणालमध्ये खटके गेल्या दोन महिन्यांपासून खटके उडू लागलेत... त्यामुळे दोघांच्या नात्यातील तणावही वाढलाय. 

सोहाला आत्ताचं आई बनायचं नाही

मिळालेल्या माहितीनुसार, ३७ वर्षांच्या सोहा आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करतेय... आणखी काही सिनेमे तिला करायचेत... आणि यासाठी ती आत्ताच आई बनण्यासाठी तयार नाही. परंतु, कुणाल आणि त्याचे कुटुंबीय मात्र यासाठी तयार नाहीत... त्यामुळेच या जोडप्यात वारंवार खटके उडत आहेत.   

या वादातूनच हे जोडपं वेगळं होण्याच्या मार्गावर येऊन ठेपलंय. त्यामुळे, दोघांच्याही कुटुंबामध्ये तणावाचं वातावरण आहे.