शाहरूख-काजोल पडद्यावर पुन्हा एकत्र, अजय देवगन म्हणाला...

अभिनेता अजय देवगनने म्हटलं आहे की, आपली पत्नी काजोल आणि सुपरस्टार शाहरूख खानला, पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर पाहण्याची आपली इच्छा आहे. तसेच अजय देवगन याला याचा आनंद आहे की, ही जोडी एकत्र पडद्यावर दिसणार आहे.

Updated: Jul 16, 2015, 10:26 AM IST
शाहरूख-काजोल पडद्यावर पुन्हा एकत्र, अजय देवगन म्हणाला... title=

मुंबई : अभिनेता अजय देवगनने म्हटलं आहे की, आपली पत्नी काजोल आणि सुपरस्टार शाहरूख खानला, पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर पाहण्याची आपली इच्छा आहे. तसेच अजय देवगन याला याचा आनंद आहे की, ही जोडी एकत्र पडद्यावर दिसणार आहे.
  
रोहित शेट्टीचा सिनेमा 'दिलवाले'मध्ये शाहरूख आणि काजोलची केमेस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, एवढंच नाही ब्लॉक बस्टर  चित्रपट 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'कुछ कुछ होता है' आणि 'कभी खुशी कमी गम' यात ही जोडी सुपर हीट ठरली आहे.
  
शाहरूख-काजोलची जोडी सर्वात शेवटी २०१० मध्ये 'माय नेम इज खान' या चित्रपटात दिसली होती. त्यानंतर आता दिलवाले सिनेमात दिसणार आहे.

अजय देवगन म्हणतो, मला खूप आनंद आहे की ते एकत्र पडद्यावर दिसणार आहेत, ते खूप चांगले मित्र आहेत, सर्व प्रेक्षक त्यांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी उत्साही आहेत. काजोलच्या या चित्रपटाबद्दल मी उत्साही आहे. 

काजोल आणि शाहरूख पडद्यावरील सर्वोत्कृष्ट जोडी आहे का?
हा प्रश्न अजय देवगनला विचारल्यावर तो म्हणाला,  मला हे नेमकं माहित नाही, मी या विषय़ी जास्त विचारही केला नाही. मात्र एक चांगली केमेस्ट्री आणि भूमिकेनुसार कुणीही पडद्यावर शोभून दिसू शकतं.

शाहरूख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि रोहित शेट्टी प्रॉडक्शन निर्मित चित्रपट 'दिलवाले'मध्ये, वरून धवन, कृती सैनन, बोमन ईरानी आणि विनोद खन्नाही असणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.