'पडद्यावरची आई' हरपली, सुलभा देशपांडे यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. सुलभा देशपांडे यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्या ८० वर्षांच्या होत्या.

Updated: Jun 4, 2016, 07:48 PM IST
'पडद्यावरची आई' हरपली, सुलभा देशपांडे यांचं निधन title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. सुलभा देशपांडे यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्या ८० वर्षांच्या होत्या.

मराठीसह हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या सुलभा देशपांडे यांच्या निधनामुळे अवघ्या चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सुलभा देशपांडे यांच्या अनेक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. आदमी खिलौना है, गुलाम-ए-मुस्तफा, विरासत या हिंदी चित्रपटांतल्या त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

तर मराठीत शांतता! कोर्ट चालू आहे, चौकट राजा, आजी आणि नात या चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. त्यांना 'पडद्यावरची आई' म्हणून ओळखले जायचे. मागील एक-दोन वर्षात आलेल्या विहीर, हापूस या सिनेमातही त्यांनी काम केलं होतं.