सनी लिऑन बनली क्रिकेट टीमची मालकीन

बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिऑन ही क्रिकेटची चाहती आहे. सनी लिऑन ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची खूप मोठी चाहती आहे. क्रिकेटवर सनीचं असलेलं प्रेम हे तिने एक क्रिकेटची टीम घेऊन वर्तवलं आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 25, 2016, 06:47 PM IST
सनी लिऑन बनली क्रिकेट टीमची मालकीन title=

मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिऑन ही क्रिकेटची चाहती आहे. सनी लिऑन ही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची खूप मोठी चाहती आहे. क्रिकेटवर सनीचं असलेलं प्रेम हे तिने एक क्रिकेटची टीम घेऊन वर्तवलं आहे.

सनी लिऑन ही बॉक्स क्रिकेट स्पर्धेत सहभागी होत आहे. सनीने चेन्नई स्वॅगर्स ही टीम विकत घेतली आहे. सनी लिऑन ही फूटबॉलची ही चाहती आहे. लहान असतांना ती खूप फूटबॉल खेळायची पण आता तिला क्रिकेट देखील खूप आवडायला लागलं आहे असं सनीने म्हटलं आहे.

एकता कपूर, सनी अरोडा आणि आनंद मिश्रा यांनी देखील क्रिकेट टीम घेतल्या आहेत.  या लीगमध्ये रित्विक धनजानी, मौनी रॉय आणि संग्राम सिंह हे एकमेकांच्या विरोधात खेळतांना दिसणार आहे.  सनी लिऑनने म्हटलं की तिचे वडील हे क्रिकेटचे चाहते होते. आज ते असते ते मी त्यांच्या नावाने ही टीम खरेदी केली असती.