सनी लियोनच्या 'एक पहेली लीला'च्या ट्रेलरला प्रेक्षकांची पंसती

'ये तो सिर्फ ट्रेलर था, पूरी पिचर अभी बाकी हे मेरे दोस्त' हा ओम शांती ओम मधील हा डायलॉग सनी लियोनच्या अगामी 'एक पहेली लीला' या सिनेमासाठी तंतोतंत जुळत आहे. कारण तिच्या या सिनेमाचा ट्रेलर वायरल झाला आणि लोकांनी त्याला प्रचंड पसंती दिली आहे.

Updated: Mar 15, 2015, 06:12 PM IST
सनी लियोनच्या 'एक पहेली लीला'च्या ट्रेलरला प्रेक्षकांची पंसती title=

मुंबई : 'ये तो सिर्फ ट्रेलर था, पूरी पिचर अभी बाकी हे मेरे दोस्त' हा ओम शांती ओम मधील हा डायलॉग सनी लियोनच्या अगामी 'एक पहेली लीला' या सिनेमासाठी तंतोतंत जुळत आहे. कारण तिच्या या सिनेमाचा ट्रेलर वायरल झाला आणि लोकांनी त्याला प्रचंड पसंती दिली आहे.

सनी लियोनच्या 'एक पहेली लीला' या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आणि अपेक्षेप्रमाणे लोकांनाही तो आवडला. या ट्रेलरला आतापर्यंत तब्बर 12 मिलीयनपेक्षा जास्त वेळा पाहिलं गेलं आहे. यावरून सनी लियोनच्या फॅन्सचा अंदाज लावला जाऊ शकतो.

सिनेमात सनीची दोन रूपं दिसणार आहेत. विदेशी मॉडल आणि राजस्थानी मुलगी अशा दोन भिन्न भूमिक ती साकारणार आहे. सिनेमात सनीने बरेच बोल्ड सिन सुद्धा दिले आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ऐश्वर्या रॉयच्या 'ढोली तारो' या प्रसिद्ध गाण्यावरही ती थिरकतांना प्रेक्षकांना दिसेल. 
 
सिनेमात सनी सोबत जय भानुशाली, रजनीश दुग्गल, मोहीत अहलावत, मानस रंजन नायक आणि राहुल देव हे मुख्य भूमिकेत आहेत.  सिनेमाच दिग्दर्शन बॉबी खान आणि निर्मिती  भूषण कुमार यांनी केली आहे. 10 एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.