सनी लिऑनचा पती बिग बॉसमध्ये

वाजत गाजत मोठ्या धुमधडाक्यात बिग बॉस सिजन 8 च्या शोमध्ये सदस्य होण्यासाठी  कलाकारांची शोधमोहीम सुरू झालेली आहे. अनेक नावांची जोरदार चर्चा केली जात आहे कारण हे कलाकार बिग बॉस सिजन 8 ला मोठा टीआरपी देण्यात य़शस्वी होतील.

Updated: Aug 22, 2014, 01:57 PM IST
 सनी लिऑनचा पती बिग बॉसमध्ये title=

मुंबई : वाजत गाजत मोठ्या धुमधडाक्यात बिग बॉस सिजन 8 च्या शोमध्ये सदस्य होण्यासाठी  कलाकारांची शोधमोहीम सुरू झालेली आहे. अनेक नावांची जोरदार चर्चा केली जात आहे कारण हे कलाकार बिग बॉस सिजन 8 ला मोठा टीआरपी देण्यात य़शस्वी होतील.

या शोमुळे बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिऑन हे नाव  हिंदी चित्रपटामध्ये स्थान मिळाले होते. यावेऴेस जोरदार चर्चा आहे की, सनीचा पती डेनियल वेबर याला या सिजनमध्ये जोडले जाऊ शकते. सनीचा पती असल्यामुऴे डेनियलला ही बघण्यासाठी लोकांमध्ये उत्सुकता  असेल डेनियलला बॉलिवूडमध्ये स्वतःचे नाव करायचे असेल तर बिग बॉस सिजन 8 हा शो डेनियलसाठी  खूप मोठी संधी घेऊन येणार आहे.

सुत्रांच्या मते डेनियल ही या शोसाठी उत्सुक आहे, पण आपल्या मानधन या कारणामुऴे चर्चेला ब्रेक लागला. सगऴ्यात मोठी चिंता डेनिय़ला लागून राहिली  ती  पत्नी सनीची. कारण खूप मोठ्या कालावधीसाठी तो आपल्या पत्नीपासून लांब राहणार आणि सनीचं सगळे काम डेनियल करत असतो अशा वेऴेस सनीची चिंता डेनियलला लागून राहिली आहे.   

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.