कपिलची 'बुआ' आता 'कॉमेडी नाइट्स लाइव'मध्ये येणार

मुंबई : कपिल शर्माचा 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' बंद झाल्यापासून यातील कलाकार आता काय करणार याची उत्सुकता लागली होती. 

Updated: Jan 29, 2016, 11:03 AM IST
कपिलची 'बुआ' आता 'कॉमेडी नाइट्स लाइव'मध्ये येणार title=

मुंबई : कपिल शर्माचा 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' बंद झाल्यापासून यातील कलाकार आता काय करणार याची उत्सुकता लागली होती. आता त्याजागी 'कॉमेडी नाइट्स लाइव' हा नवा शो सुरू होतो. या शोमध्ये कृष्णा अभिषेक, भारती, रश्मी देसाई आणि सुदेश लहरी सोबतच कपिलच्या शो मधील 'बुआ' म्हणजेच उपासना सिंगसुद्धा असेल.

उपासनाच्या मते नवज्योत सिंग सिद्धू पण या शोमध्ये दिसणार आहे. तसेच कॉमेडी नाइट्स विथ कपिल इतका हिट होणे हा सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का होता. या शोचा एक भाग होता आल्याबद्दल ती खूश आहे. त्याचबरोबर कपिलसोबत जर भविष्यात तिला काम करायची संधी मिळाली तर तिला तो करायला नक्की आवडेल.

सध्या मात्र तिचं शेड्यूल फार व्यस्त आहे. अनेक मालिका आणि स्टेज शो मध्ये ती फार व्यस्त आहे. म्हणूनच 'नच बलिये'ची ऑफरही तिने नाकारली होती.

'बुआ'चे काही डायलॉग फार प्रसिद्ध झाले होते. अगदी पहिल्यापासूनच ती सर्वांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळे आता नव्या शो मध्ये ती लोकांच्या पसंतीस उतरणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.