VIDEO : कटप्पा - शिवगामीचा रोमान्स व्हायरल!

रोमान्स... आणि तोही कटप्पा आणि शिवगामीचा... कसं शक्य आहे हे? आणि कधी घडलं हे... असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात आलेच ना... 

Updated: May 5, 2017, 01:41 PM IST
VIDEO : कटप्पा - शिवगामीचा रोमान्स व्हायरल! title=

मुंबई : रोमान्स... आणि तोही कटप्पा आणि शिवगामीचा... कसं शक्य आहे हे? आणि कधी घडलं हे... असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात आलेच ना... 

'बाहुबली - द बिगिनिंग' आणि 'बाहुबली : द कन्क्लुजन' असे दोन्ही सिनेमे बघून झाले असतील तरी असा कोणताही प्रसंग तुम्हाला सिनेमात दिसला नसेल... तरी हा व्हिडिओ सोशल मीडियावर कसा व्हायरल होतोय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर थांबा... 

कारण, बाहुबली सिनेमातल्या कटप्पा आणि शिवगामीचा रोमान्स एका जाहिरातीत दाखवण्यात आलाय. अभिनेता सत्यराज (कटप्पा) आणि अभिनेत्री राम्या कृष्णा (शिवगामी) हे दोघेही या जाहिरातीत दिसत आहेत. एका टेक्सटाईल ब्रॅन्डची ही जाहिरात आहे. 'बाहुबली'ला मिळालेल्या यशाचा आणि लोकप्रियतेचा या ब्रॅन्डला चांगलाच फायदा होतोय, असं म्हणता येईल.