व्हिडिओ : 'बिग बॉस9'च्या दुसऱ्या प्रोमोत सलमानचा 'डबल ट्रबल'!

टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस ९'चा दुसरा प्रोमा प्रदर्शित करण्यात आलाय. या प्रोमोमध्ये सलमान खान सहभागी स्पर्धकांच्या 'डबल ट्रबल'ची झलक दाखवताना दिसतोय. 

Updated: Sep 11, 2015, 05:57 PM IST
व्हिडिओ : 'बिग बॉस9'च्या दुसऱ्या प्रोमोत सलमानचा 'डबल ट्रबल'! title=

मुंबई : टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस ९'चा दुसरा प्रोमा प्रदर्शित करण्यात आलाय. या प्रोमोमध्ये सलमान खान सहभागी स्पर्धकांच्या 'डबल ट्रबल'ची झलक दाखवताना दिसतोय. 

'यावेळी एक करणार दुसऱ्याला ट्रबल कारण हा आहे डबल ट्रबल' अशी टॅगलाईन म्हणणारा सलमान खान यावेळी आणखीन काहीतरी मजेशीर सादर करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. 

यावेळी बिग बॉसमध्ये अनेक मजेशीर आणि वादग्रस्त जोड्या दिसतील, असं दिसतंय. बिग बॉससाठी यंदा सलमाननंही 'नवरंग'प्रमाणे नऊ वेगवेगळे प्रोमो शूट केलेत. यामध्ये स्पर्धकांचे नऊ पद्धतीच्या भावना दर्शवण्यात आल्यात. आत्तापर्यंत या कार्यक्रमाचे दोन प्रोमो प्रदर्शित करण्यात आलेत. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.