बॉक्स ऑफिसवर दिलवाले आणि बाजीरावमध्ये जोरदार मुकाबला

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि शाहरुख खान स्टारर दिलवाले सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांमध्ये दिवशी ६४ कोटींची कमाई केली. पहिल्या दिवशी या सिनेमाने २१ कोटींची कमाई केली होती. दुस-या दिवशी २० आणि तिस-या दिवशी २३ कोटींची कमाई केली आहे.

Updated: Dec 21, 2015, 12:40 PM IST
 बॉक्स ऑफिसवर दिलवाले आणि बाजीरावमध्ये जोरदार मुकाबला title=

मुंबई : रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि शाहरुख खान स्टारर दिलवाले सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तीन दिवसांमध्ये दिवशी ६४ कोटींची कमाई केली. पहिल्या दिवशी या सिनेमाने २१ कोटींची कमाई केली होती. दुस-या दिवशी २० आणि तिस-या दिवशी २३ कोटींची कमाई केली आहे.

तर दुसरीकडे बाजीराव-मस्तानीने पहिल्या दिवशी १२.८० कोटी तर दुस-या दिवशी १५.५२ कोटींची कमाई केली. तिस-या दिवशी सिनेमाच्या कमाईमध्ये लक्षणीय वाढ झाली असून सिनेमाने १८ कोटींची कमाई केली. त्यामुळे तीन दिवसांमध्ये या सिनेमाने ४६.३२ कोटींची कमाई केली.

दोन मोठे सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याचा फटका या सिनेमांना बसला. शाहरुखच्या दिलवाले जरी या रेस मध्ये पुढे असला तरी वीकेंडला १०० कोटींच्या क्लबमध्ये जाण्यापासून हा सिनेमा वंचित राहिला. त्यामुळे ही रेस जिंकून पण बाजीगर हारला असचं म्हणावं लागेल.