करिनाच्या पहिल्या 'लिप किस' पोस्टरची गावभर चर्चा

करिना कपूर आणि अर्जुन कपूरचा आगामी चित्रपट की अँड का या चित्रपटाचे पोस्टर सध्या खूप चर्चेचा विषय बनले आहे. या पोस्टमध्ये करिना कपूर आणि अर्जूनला लिप टू लिप किस करताना दाखविले आहे. 

Updated: Feb 15, 2016, 02:04 PM IST
करिनाच्या पहिल्या 'लिप किस' पोस्टरची गावभर चर्चा title=

मुंबई : करिना कपूर आणि अर्जुन कपूरचा आगामी चित्रपट की अँड का या चित्रपटाचे पोस्टर सध्या खूप चर्चेचा विषय बनले आहे. या पोस्टमध्ये करिना कपूर आणि अर्जूनला लिप टू लिप किस करताना दाखविले आहे. 

करिनाने आपल्या करिअरमध्ये पहिले किसिंगचे पोस्टर प्रसिद्ध करण्यास परवानगी दिली आहे. त्या आता गावभर चर्चा सुरू आहे. 

अर्जुनने सगळ्याच चित्रपटांत अभिनेत्रींना ऑनस्क्रिन किस्स केले आहे. जेव्हा पाहावं तेव्हा तो अभिनेत्रींवर चान्स मारतो. असे करिना कपूरने अर्जुनबद्दल सांगतले. 

या पोस्टरबद्दल अर्जुन देखील एक्सायटेड आहे. तो म्हणतो, 'हा पोस्टरवरचा फोटो सगळ्यांचाच फेवरेट फोटो आहे. यात काहीही जबदस्तीनं केलेलं नाही. यात फक्त एका जोडप्याचे किती एकमेकांवर प्रेम आहे हेच दिसून येतं.'

'की अॅण्ड का' हा सिनेमा लग्न झालेल्या जोडप्यावर आधारित असून अर्जुन आणि करीना, 'किया' आणि 'कबीर' नावाच्या नवराबायकोची भूमिका करत आहेत. या बहुचर्चित फोटोमध्ये दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे.

करीनाचं हे पहिलंच किसिंग पोस्टर असतलं तरी देखील ती याबाबत कूल दिसतेय. ती म्हटतेय,

'चित्रपटात मी आणि अर्जून कूल कपलच्या भूमिका करतोय. अशात जर का 'की अॅण्ड का'मध्ये आम्ही किस्स नाही करणार तर मग कोण करणार?'

सेटवर करिना आणि अर्जुनची केमिस्ट्री फारच छान जुळल्याचं जाणवतं. करीना आणि अर्जुनची ऑफ स्क्रीन छान जुळलेली ही केमेस्ट्री ऑन स्क्रीनवरही कितपत जमलीय हेच आता पाहायचंय.